महापौरांचा काळ्या दिनाच्या मूक सायकल फेरीतील सहभागा बद्दल जिल्हाधिकाऱ्यानी सर्व माहितीचा अहवाल करून राज्य सरकार कडे पाठवला आहे.
एक नोव्हेंबर काळ्या दिनी महापौर संज्योत बांदेकर या तोंडावर काळी पट्टी बांधून मूक मोर्चात सामील झाल्या होत्या. गेली अनेक वर्षे काळ्या दिनात सहभागी होणाऱ्या मराठी नगरसेवकांना सरकारने कारणे दाखवा नोटीस बजावली होती पालिका बरखास्त देखील केली होती.
याच पाश्वभूमीवर जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांनी सायकल फेरीत किती नगरसेवक अन्य लोकप्रतिनिधी सहभागी झालेत याचा पूर्ण अहवाल बनवून राज्य सरकारला पाठविला आहे या नंतर राज्य सरकार कोणती कारवाई करावी याबाबत निर्णय घेणार आहे.
कालच पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनी महापौरांवर कायदेशीर कारवाई करू असे संकेत दिले होते डी सी यांनी पाठवलेल्या रिपोर्ट ला महत्व प्राप्त झाले आहे.
आगामी सहा महिन्यात विधानसभा निवडणुका जवळ असल्याने कोणतीही कारवाई केल्यास काँग्रेस ला मारक ठरू शकेल असं मत देखील काँग्रेस च्या अनेकांनी राज्य सरकार कडे मांडलं असल्याने कारवाईची शक्यता खूपच कमी आहे अशी देखील माहिती उपलब्ध झाली आहे.
Trending Now