काळ्या दिनाच्या सायकल फेरीत सहभागी झाल्यामुळं पोटशूळ उठलेल्या कानडी संघटनांच्या धास्तीमुळं पोलिसांनी महापौर संज्योत बांदेकर यांच्या घरा समोर पोलीस बंदोबस्त ठेवला आहे.
बुधवारी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या मूक सायकल फेरीत तोंडावर काळी पट्टी बांधून आपला सहभाग दर्शवत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला होता.लोकशाही आणि भारतीय घटनेने दिलेल्या अधिकारा नुसार महापौरानी काळ्या दिनाच्या सायकल फेरीत सहभाग दर्शवला होता.
खडे बाजार पोलिसांनी गोंधळी गल्लीतील महापौरांच्या घरा समोर चार पोलीस कॉन्स्टेबल तैनात केले आहेत तर यात एक बंदूकधारी पोलीस देखील सामील आहे.
उध्या पालिकेची बैठक होणार आहे महापौर त्या बैठकीत सहभागी होणार आहेत अशी माहिती मिळाली आहे.