काळ १ नोव्हेंबर काळ दिन झाला. या दिनाने सीमाभागातील मराठी भाषिक व्यक्तींच्या भावना प्रगट झाल्या, या लढ्यात युवक नाहीत असे म्हणणाऱ्या लोकांना ही मोठी चपराक आहे. यावर्षीच्या सायकल फेरीत ग्रामीण भागापेक्षा शहरी भागातील युवकांचा भरणा अधिक होता त्यामुळं जास्तीतजास्त युवक सहभागी झाल्याने आता राष्ट्रीय पक्षांची हवा गेली, ही परिस्थिती कायम राखण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे.
नवयुवक या प्रश्नात नाहीत असा कांगावा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे.हा समज खोटा ठरवण्यात आला आहे, कालच्या मूक फेरीत हे उघड झाले, आता या तरुणांची मोट बांधून ठेवण्याचे काम समिती नेत्यांना करावे लागेल.
दरवर्षी काळ्या दिनाला बोलवायचे आणि तो झाला की युवकांची वर्षभर विचारपुस सुद्धा करायची नाही असे वातावरण आहे. या सामूहिक गुन्ह्यात तरुण अडकले की त्यांना सोडवून आणणारे कोण नेते शिल्लक नाहीत, अशाने राष्ट्रीय पक्ष वाढू लागले आहेत.
दरवर्षी असा अनुभव येऊन तरुण भरकटत असतात, अशावेळी समिती नेत्यांनी युवा शिबिरे भरवून तरुण वर्गाला जोडून घेण्याची गरज आहे.