बेळगावात येणे माझ कर्तव्य आहे, मी मराठी आहे ही माझी ओळख आहे, सर्व सिमाभागातले मराठी माझे बांधव आहेत आम्हालाही दडपशाही करायची भाषा करायला येते महाराष्ट्रात देखील कन्नडिग गुण्या गोविंदाने राहतात याचा विचार कर्नाटकाने करावा आणि मराठी भाषिकावरील अत्याचार थांबवावेत असा असा इशारा आमदार नितेश राणे दिला आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे काढण्यात आलेल्या काळ्यादिनाच्या फेरीच्या सांगते नंतर आयोजित सभेत नितेश राणे बोलत होते . महाराष्ट्रातील सर्व आमदार ,खासदार याना एकत्र आणून सीमाप्रश्न मी सोडवला तर राजकारणात आल्याचे सार्थक झाले असे समजेन .आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात घेऊन जाणारच असेही नितेश राणे म्हणाले . नवीन पिढी रस्त्यावर उतरली आहे यांना सुद्धा महाराष्ट्रात यायचं आहे मोठ्या प्रमाणावर युवक जमलेत महाराष्ट्रात यायला आतुर झालेले आहेत मराठी युवकांची उपस्थिती इच्छासक्ती महाराष्ट्रात येण्याची तीव्र आहे भविष्यात सीमाभागातील मराठी माणसाची जबाबदारी घेण्याची माझी तयारी आहे अस देखील ते म्हणाले
याप्रसंगी व्यासपीठावर अध्यक्ष दीपक दळवी ,सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर ,माजी आमदार मनोहर किणेकर ,आमदार संभाजी पाटील ,प्रकाश मरगाळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते .बेळगावसह सीमाभाग कर्नाटकात अन्यायाने डाम्बल्याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे काळा दिन पाळून भव्य मूक फेरी काढण्यात आली .
महाराष्ट्रात जाण्याच्या जिद्दीचे दर्शन घडवत हजारो मराठी भाषिक फेरीत सहभागी झाले होते . दंडाला,डोक्याला काळ्या फिती बांधून आबालवृद्ध काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी झाले होते.अनेकजण काळे कपडे परिधान करून फेरीत सहभागी झाले होते.बेळगाव ,कारवार ,निपाणी ,बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे,जय भवानी जय शिवाजी ,रहेंगे तो महाराष्ट्राने नही तो जेलमे अशी जोरदार घोषणाबाजी कार्यकर्त्यांनी केली.अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या मागणीचे आणि निषेधाचे फलक हातात घेतले होते.निषेधाचे काळे ध्वज तसेच भगवा ध्वज घेऊन अनेकजण फेरीत सहभागी झाले होते.महाराष्ट्रातील आमदार नितेश राणे देखील काळ्यादिनाच्या फेरीत सहभागी झाले होते.
शाळकरी मुले देखील दिल्लीश्वरानो आता मी देखील लढ्यात उतारलोय अशा आशयाचा फलक हातात घेवुन फेरीत सहभागी झाली होती.आम्ही लोकशाही देशात राहतो कि हुकूमशाही देशात,असा फलक लहान मुलीनी हातात घेतला होता . महापौर संज्योत बांदेकर,माजी महापौर सरिता पाटील,माजी उपमहापौर रेणू किल्लेकर यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने महिलानी फेरीत हजेरी लावली होती.महिला फेरीत तोंडाला काळी पट्टी बांधून आल्या होत्या.आमदार संभाजी पाटील ,किरण ठाकूर यांच्यासह अनेक नगरसेवक फेरीत उपस्थित होते . शिवसेनेचे कार्यकर्ते प्रकाश शिरोळकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शिवसैनिकांनी फेरीत भाग घेतला होता.फेरीतील शिवसैनिकांनी काळे कपडे परिधान करून हातात निषेधाचे काळे ध्वज घेतले होते.फेरी जशी पुढे जात होती तसा फेरीत सीमावासीयांचा सहभाग वाढत होता.आमदार संभाजी पाटील यांच्यासह अनेक नगरसेवक फेरीत अग्रभागी होते.,महापौर संज्योत बांदेकर यांनी फेरीत हजेरी लावली एक किलोमीटर पेक्षाही फेरी लांब होती . सायकल,दुचाकीवरून फेरीत आलेल्यापेक्षा चालत आलेल्यांची संख्या मोठी होती.
राज्य सरकारचा बरखास्तीचा विरोध झुगारत महापौर संज्योत बांदेकर यांनी काळ्या दिनाच्या सायकल फेरीत सहभाग दर्शवला होता. दुसरीकडे महापौर काळ्या दिनाच्या सायकल फेरीत सहभागी झाल्याच निमित्य करून पोटशूळ उठलेल्या कानडी संघटनांनी महा पालिकेवर काही काल लाल पिवळा ध्वज पोलीस बंदोबस्तात फडकवला होता. सायकल फेरीत महापौर सह १८ नगरसेवकांनी देखील हजेरी लावली होती