भाजीवाल्यांना ५० आणि फिरत्या विक्रेत्यांना १०० रुपये भाडे घेण्याचा निर्णय चुकीचा आहे , स्थायी समितीवर मोठया पदावर असलेल्या भाजपच्या नगरसेवकाने यांनी पालिका आयुक्तांना हाताशी धरून आणि पालिका सभागृहात चर्चाही न करता हा निर्णय घेतला आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे.
दक्षिण भागातल्या एका भाजपच्या नगरसेवकाने हा निर्णय घेण्यास पुढाकार घेतला आहे त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचा विरोध करून काही भाजप नेत्यांनी समिती नगरसेवकांची नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न सुरू केल्याचा आरोप मराठी नगरसेवकांनी केला आहे
पालिका आयुक्तांनी यापुढे कुठलेही निर्णय घेताना सर्व नगरसेवकांना विश्वासात घेण्याची गरज आहे, अन्यथा महा पालिका यंत्रणेला जनतेच्या विरोधाला सामोरे जावे लागणार आहे. भाजी विक्रेत्यांच्या भु भाडे वाढ करारास मराठी नगरसेवक मासिक बैठकीत कडाडून विरोध करणार असल्याची देखील माहिती बेळगाव live कडे मिळाली आहे.