Thursday, December 19, 2024

/

काळ्या दिनी ना गाडी ना घोडा …फक्त मूक सायकल फेरी

 belgaum

काळ्या दिनी काळे ध्वज आणि वस्त्रे घालून सहभागी होणाऱ्यानो यंदा नको गाडी….. नको घोडा…. सहभागी व्हा फक्त आणि फक्त सायकल घेऊन, सायकल नसेल तर पायी या….. चला तर मग परंपरा पाळूया…… गालबोट टाळूया आणि काळ्या दिनी आपल्याला लोकशाहीने दिलेला मूक निषेधाचा अधिकार मूकपणे बजाऊया.

बेळगाव live ने दिलेल्या या आवाहनास चांगला प्रतिसाद मिळत आहे. काही महिला आणि अबालवृद्ध सदस्य वगळता इतर सर्वांनी फक्त सायकल घेऊन येण्याची गरज आहे. त्याची तयारी सुरू आहे.१९५६ साली १ नोव्हेंबर ला सीमाभाग कर्नाटकात घालण्यात आला. तेंव्हापासून दरवर्षी या दिवशी काळादिन पाळला जातो. मूक सायकल फेरी हे काळा दिनाचे मूळ स्वरूप आहे, हे प्रत्येकाने जसेच्या तसे जपणे गरजेचे आहे.
मागील काही वर्षांत तरुण वाढले, यंदा तर तरुणांचा महापूर येईल याची खात्री आहे, येताना प्रत्येकाने एकतर सायकल आणा नाहीतर चालत या. यावर्षी पासून एकही वाहन या मूक मिरवणुकीत दिसता कामा नये याची काळजी तरुणांनी घ्यावी, सायकलचाच वापर करा, हे नम्र आवाहन आहे.

Black day logo
युवकांनी आणि सगळ्यांनीच मोटार सायकली आणून मूक सायकल फेरीचे स्वरूप बदलले आहे. एझडी, बुलेट, स्कुटी फेरी असे स्वरूप आले आहे. हे स्वरूप वेगवेगळ्या कारणांनी घातक ठरत आहे, घोडा घेऊन आल्याने तर नको ते प्रकार झाले आणि नंतर गुन्हे दाखल करण्यात आले, परत परत याची पुनरावृत्ती होऊ नये, हे पाहणे हीच आपली जबाबदारी आहे.
यंदा आम्ही मराठा आणि मराठी क्रांती मोर्चा केला. कोणतेही वाहन नसताना १२ ते १३ लाख नागरिक सहभागी झाले आणि इतिहास घडला. अतिशय शिस्त बद्ध मिरवणूक काढण्यात आली. अजूनही वेळ आहे, तरच काळा दिन चे पावित्र्य टिकून राहील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.