भारतीय राज्य घटनेने देशातील नागरिकाना दिलेल्या अधिकाराचा वापर करत सर्व मराठी भाषिक नगरसेवकांनी 1 नोव्हेंम्बर च्या काळ्या दिनाच्या सायकल फेरीत सहभागी व्हावं असा निर्णय नगरसेवकांच्या बैठकीत घेण्यात आला.
मंगळवारी दुपारी कॅम्प येथे आमदार संभाजी पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मराठी नगरसेवकांची बैठक झाली या बैठकीत अस आवाहन करण्यात आलं आहे.
या बैठकीस महापौर संज्योत बांदेकर उपमहापौर नागेश मंडोळकर महेश नाईक किरण सायनाक अनंत देशपांडे संजय शिंदे,सरिता पाटील रेणू मुतगेकर आदी नगरसेवक उपस्थित होते.
बेळगावातील मराठी माणसास जन्मताच आंदोलन चळवळ करत आलेला आहे काळा दिवस हा लढा आणि अन्याया विरुद्धची झुंज आहे यात अनेकांचा योगदान आणि त्याग आहे त्यामुळे कोणतेही पद याच्या पुढे मोठे नाही त्यामुळं सर्व मराठी नगरसेवकांना सायकल फेरीत सहभागी व्हा अस आवाहन केलं आहे अशी माहिती मराठी गटनेते पंढरी परब यांनी बेळगाव live कडे बोलताना दिली आहे.
बैठकीत स्वातंत्र्याचा निर्णय
बैठकीत प्रत्येक नगरसेवकाला काळ्या दिनाच्या सायकल फेरीत सहभागी होण्याचे स्वातंत्र्य देण्यात आले आहे.आपापल्या वार्डातील मराठी जनता पंच मंडळीना विश्वासात घेऊन प्रत्येकांनी सहभागी होण्या बद्दल निर्णय घ्यावा सहभागी झाल्यास किंवा गैरहजर राहिल्यास गट जबाबदार राहणार नाही असे देखील ठरविण्यात आले आहे.
महापौर उपमहापौर सहभागी होणार का?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बैठकीत सहभाग स्वातंत्र्य दिल्याने महापौर संज्योत बांदेकर यांच्या सहभागा बद्दल साशंकता आहे तर उपमहापौर नागेश मंडोळकर यांनी सहभाग दर्शवण्यास बैठकीतच नकार दिला आहे.दुसरीकडे नगरसेवक विनायक गुंजटकर हे अगोदरच धार्मिक सहलीवर गेले आहेत त्यामुळे उध्या च्या सायकल फेरीत किती नगरसेवक सहभागी होतील हेच पहावं लागेल.एकूणच विधान सभा निवडणुकीच्या सहा महिने अगोदर काळा दिवस अधिवेशन मेळावा याच्या पाश्वभूमीवर बेळगावात भरपूर राजकीय घटना घडणार आहेत
https://m.facebook.com/story.php?story_fbid=505840573106874&id=375504746140458
महापौर ,उप महापौर यांच्या सह प्रत्येक नगरसेवक तसेच इतर अनेक पदाधिकारी यांनी सहभागी झालेच पाहिजे.
जर पदासाठी आणि स्वार्थासाठी कोणी सहभागी झाले नाही तर ते मराठी माणसाशी गद्दारी करत आहेत हे लक्षात ठेवा.