१ नोव्हेंबर काळ्या दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने काढण्यात येणाऱ्या मूक सायकल फेरीस पोलिसांनी काही अति घालून परवानगी दिली आहे . मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीला मंगळवारी दुपारी लेखी परवानगीचे पत्र देण्यात आले आहे . सकाळी साडे नऊ ते दुपारी एक पर्यंत मूक फेरी संपवावी कोणत्याही शासकीय मालमत्तेचं नुकसान करू नये, दुचाकी स्वरांनी रहदारीचे नियम मोडू नयेत दोन भाषिकांना तेढ निर्माण होईल अशी घोषणा भाषण करू नये अश्या अनेक अटी घालून परवानगी देण्यात आली आह
.
पोलिसांनी मूक सायकल फेरीसाठी दिलेला मार्ग असा असणार आहे
सकाळी साडे नऊ वाजता संभाजी उद्यानातून मूक सायकल फेरीची सुरुवात होणार असून फुलबाग गल्ली रेल्वे ट्रक भांदूर गल्ली हेमू कलानी चौक रेल्वे स्टेशन रोड अंबा भवन शिवाजी रोड रामलिंग खिंड गल्ली हेमू कलानी चौक ताशिलदार गल्ली फुलबाग गल्ली पाटील गल्ली शनी मंदिर रेल्वे उड्डाण पूल एस पी एम रोड ,शिवाजी गार्डन होसूर बसवणं गल्ली ओल्ड पी बी रोड नार्वेकर गल्ली गाडे मार्ग आचार्य गल्ली सराफ गल्ली खजादे बाजार शहापूर कोरे गल्ली कचेरी गल्ली बँक ऑफ इंडिया महात्मा फुले रोड गोवा वेस मराठा मंदिर सांगता
जय महाराष्ट्र