बेळगाव सहीत संपूर्ण सीमाभाग कर्नाटकात घातला गेला, आणि याच विरोधात दरवर्षी सिमावासीय काळा दिन पाळतात. १ नोव्हेंबर रोजी काळादिनी प्रचंड मोठी मूक सायकल मिरवणूक काढण्यात येते. या मिरवणुकीत ३२ मराठी नगरसेवक काय करणार हा प्रश्न आहे.
अद्याप एकही मराठी नगरसेवकाने जागृतीची बैठक घेतली नाही किंवा कुठल्या जागृती बैठकीत सहभाग घेतलेला नाही. चंदीगड दौरा आटोपून परत आलेले नगरसेवक आणि महापौर अजून काळ्या दिनाच्या फेरीत सहभागी होणार की नाही हे स्पष्ट नाही, यामुळे चर्चा आहे
मागील काळात नगरसेवक आणि महापौर काळ्या दिनाच्या फेरीत हजर राहिले म्हणून मनपा बरखास्त करण्यात आली होती, या कारणामुळेही ही शांतता असावी अशी शक्यता आहे