मराठा लाईट इंफ्रट्री मध्ये ३ नोव्हेंबर रोजी राष्ट्रपतींनी बटालियन ला बहाल केलेल्या बटालियन ध्वज हस्तांतरण चा कार्यक्रम होणार आहे . या कार्यक्रमाला भारतचे लष्कर प्रमुख बिपीन रावत उपस्थित राहणार आहेत. लष्कर प्रमुख बिपीन रावत हे मराठा सेंटरचे कर्नल ऑफ द रेजिमेंट लेफ्ट. जनरल पी जे एस पन्नू यांना बटालियन ध्वज हस्तांतरीत करणार आहेत. ३ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ ते बारा च्या दरम्यान बेळगावातील तळेकर ड्रील मैदानावर हा कार्यक्रम होणार आहे.
२७ वर्षा नंतर मराठा रेजिमेंट मध्ये ध्वज हस्तांतरण कार्यक्रम होत आहे तिरंग्याच्या खालोखाल लष्करा मध्ये बटालियन च्या ध्वजाला मान दिला जातो या ध्वरोहण कार्यक्रमाची रंगीत तालीम दिनांक १ नोव्हेंबर रोजी होणार असून याचे निरीक्षण लेफ्ट जनरल पी जे एस पन्नू करणार आहेत. मराठा सेंटर चे जन संपर्क अधिकारी मेजर मधुकर भट्ट यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात हि वरील माहिती दिली आहे.
नाम नमक आणि निशाण हे त्रिसूत्री सैन्यासाठी मोलाची मानली जाते बटालियन चा ध्वज क्वातर गार्ड येथे दिमाखात फडकत राहणार आहे. तिन्ही सेना दलाचे प्रमुख राष्ट्रपती असतात राष्ट्रपती तिन्ही दलाच्या लष्कर प्रमुखांना ध्वज बहाल करतात मग ते प्रमुख संबधित बटालियन ध्वज हस्तांतरण करत असतात. लष्कर प्रमुखांचा हा पहिलाच बेळगाव दौरा आहे .