कार्यक्रमात भाषण संपल्यावर जय हिंद किंवा महाराष्ट्र म्हणण्याची औपचारिकता असते त्या औपचारिकतेतून त्या व्यक्तीच प्रेम व्यक्त होत असतं. त्यातच कार्यक्रम जर बेळगावात असला की शेवट कसा होणार याकडे सर्वांचं लक्ष असतंय.
रविवारी हिंदवाडी येथे हिंदवाडी महिला मंडळाच्या कार्यक्रमात काँग्रेसचे गोव्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी सभापती प्रताप सिंह राणे यांनी भाषण संपताच जय कर्नाटक तर शिवसेनेचे गृह राज्य मंत्री दिपकभाई केसरकर यांनी जय महाराष्ट्र असा उल्लेख केला.दीपकभाई यांनी शिव सेनेची बांधिलकी दाखवत जय महाराष्ट्र उच्चारला तर प्रतापसिंह राणे यांनी आपलं कर्नाटक प्रेम दाखवत जय कर्नाटक म्हटलं.राणे यांच्या कर्नाटक प्रेमाने उपस्थितांत त्यांचं महाराष्ट्र प्रेम बेगडी असल्याची चर्चा होती.
गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर हे महाराष्ट्रवादी होते बांदोडकरानी गोवा महाराष्ट्रात विलीन व्हावा यासाठी आघाडीवर होते तर शशिकला काकोडकर सह अनेक मुख्यमंत्री देखील महाराष्ट्राच्या बाजूनेच होते मात्र माजी मुख्यमंत्र्यानी बेळगावात येऊन जय कर्नाटकचा सूर आवळल्याने त्यांचं कन्नड प्रेम उघड झालं आहे.
प्रताप सिंह राणे यांच्या पत्नी विजया देवी राणे या सोडूंर येथील कै एम वाय घोरपडे यांच्या कन्या असल्याने ते कर्नाटक चे जावई आहेत त्यातच विजया देवी देखील या कार्यक्रमास उपस्थित होत्या त्यामुळं त्यांना खुश करण्यासाठी त्यांनी कानडी प्रेम वाढवलं काय अशी देखील चर्चा होती.
राणे यांना कर्नाटका बद्दल एवढी आपुलकी असेल गोवा काँग्रेस नी कर्नाटक बरोबर असलेला कळसा भांडुरा वाद संपवावा तो प्रश्न प्रलंबित ठेऊ नये असा प्रश्न देखील विचारला जात आहे.