मराठा लाईट इन्फंट्री सेंटरमध्ये शरकत दिन अर्थात पहिल्या महायुद्धात मिळविलेल्या विजयाचे स्मरण करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.रविवारी सायंकाळी तळेकर ड्रील मैदानावर या खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
११४ मराठाने पहिल्या महायुद्धात अतुलनीय शौर्य गाजवून २९ ऑक्टोबर १९१८ रोजी विजय मिळवला होता.तत्कालीन मेसोपोटेमिया येथील शरकत येथे मराठाने विजयश्री प्राप्त केली होती.त्यानिमित्त दरवर्षी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरमध्ये त्या विजयाचे स्मरण करण्यासाठी शरकत दिन साजरा केला जातो.
प्रशिक्षणार्थी जवानां कडून सुरुवातीला मैदानावर शिवा काशीद याच बलिदान प्रयोग सादर केल्यावर लेझीम मल्लखांब ऐरोबिक्स,जिमन्यास्टिक, मिलीटरी बँड प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितात दाद मिळवली. यावेळी मराठा सेंटर चे ब्रेगेडियर गोविंद कलवड सह जे सी ओ सेंटर अधिकारी मोठ्या संख्यने उपस्थित होते.