उत्तर विधानसभा मतदार संघाकडे अनेकांचं लक्ष लागल असतानाराष्ट्रीय पक्षात तिकिटासाठी एका इच्छुकांन आज आपल्या समर्थकांना उचगावात मेजवानीचे आयोजन केले होते.त्या मेजवानीत तब्बल ८०० किलो मटणाचा फडशा पडला.
विशेष म्हणजे निवडणूक अजून सहा महिने दूर असतानाच अनेक इच्छुकांनी जेवणावळ चालू केल्या आहेत आणि त्यातल्या त्यात मटणाची जेवण देऊन तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न चालविला आहे. रविवारी झालेल्या या मेजवानीला नेमका सुट्टीचा दिवस निवडून दादांनी बऱ्यापैकी तरुणांना आकर्षित केले होते. विशेष म्हणजे शहर परिसरातून तीन हजारहून अधिक तरुणांनी या मेजवानीचा लाभ घेतला असल्याची माहिती बेळगाव live कडे उपलब्ध झाली आहे. दुपारी एक वाजता सुरु झालेली मेजवानी सायंकाळी पाच पर्यंत चालूच होती.
राष्ट्रीय पक्षातील प्रमुख नेत्यांना वगळून या मेजवानीचे आयोजन करण्यात आल्याने याची चर्चा चांगलीच रंगली होती. विधान सभा निवडणूक जसं जशी जवळ येईल तस तश्या इच्छुका कडून मेजवान्या वाढणारच आहेत. उतर विधान सभा मतदार संघात तिकीट मिळवण्यासाठी लॉबिंग करण्यासाठीच दादांनी हि मेजवानी केली होती अशी देखील चर्चा सुरु आहे.
8000 te 9000 public hoti…….Sankhya chukichi ahe
10000 public hot 3000 nahi 800 kilo madhe Kai 3000 jevtath
Sankhya chukichi ahe ….10000 plus hoti
” श्री रमाकान्त दादा कोंदुस्कर ” यानी, ” ग्राम देवता मळेकरणी देवी मंदिर, उचगाव येथे श्री रामसेना कार्यकर्ते, मित्रबंधु परिवार , सामाजिक कार्यकर्ता बंधु , हितैषी बन्धु यांना ,” स्नेह प्रीती भोजन ” आयोजन केले. रमाकान्त दादाच्या प्रेम आग्रह स्वीकार करीत जवळ जवळ 9000 मित्र बंधुनी या आयोजनात भाग घेतला. रमाकान्त दादानी सर्वाचे प्रेमपूर्वक आभार मानले असून कार्यक्रत्या बंधुनी केलेल्या सहकार्य बद्दलही आभार मानले आहेत. जय श्रीराम .
Sankya jast hoti jastin jast maratha yuvak hote karan ramakant Dada pan maratahach ahet ani uttar made sarvat jast voting maratha ahe chala ek va maratha dadana nivdun anu