खानापूर जाम्बोटी येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रशिक्षण केंद्रास(कोब्रा COmmando Battalion for Resolute Action) व्यवस्थित मूलभूत सुविधा पुरवा अशी मागणी जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
या प्रशिक्षण केंद्राच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांची भेट घेऊन चर्चा केली आणि वीजपुरवठा, पाणी पुरवठा आणि रस्ते दुरुस्त करा अश्या मूलभूत सुविधा द्या अशी मागणी केली आहे.
सध्या या कमांडो ट्रेनिंग सेंटर मध्ये 150 प्रशिक्षणार्थी कमांडो ट्रेनिंग घेत आहेत आगामी काही दिवसात ह आकडा 350 वर पोचणार आहे त्यामुळे सुविधा द्या अशी मागणी करण्यात आली आहे.
याबाबत सी आर पी एफ ने जिल्हा प्रशासनास मागण्यांचा तपशील अहवाल दिला आहे जाम्बोटीतील जंगलात केंद्रीय राखीव दलाचे कोब्रा कमांडो प्रशिक्षित केले जातात.