नवी एम्पॅक् फोर प्रणाली, फक्त १८० रुपयात ३६० चॅनेल, त्यामध्ये ५० एचडी चॅनेल्स, डिटीएच पेक्षाही अधिक क्लिअरीटी , कन्नड आणि मराठी न्युजची स्थानिक चॅनेल्स आणि एकाच केबल मधून चॅनेल आणि इंटरनेट ची लयलूट अशी वैशिष्ट्ये असलेले नवे वरदराज केबल नेटवर्क बेळगावात आठ दिवसांपासून सुरू झाले आहे. अशी माहिती संचालक राजेश जाधव यांनी बेळगाव live ला दिली आहे.
वरदराज केबल हे नेटवर्क बंगळूर च्या संपर्क मीडिया सोबत करारबद्ध झाले आहे. या नेटवर्क च्या बरोबरीने आठ दिवसांपासून बेळगावात नवे केबल चे जाळे विणले जात आहे, इन बेलगाम आणि hathway च्या नेटवर्क पेक्षा कमी दर असणार आहे. १ रुपयात दोन चॅनेल आणि तीही अतिशय दर्जेदार विडिओ डिजिटल क्षमतेची असल्याने ग्राहकांना हे नेटवर्क जास्त आवडेल, असा विश्वास राजेश जाधव यांनी व्यक्त केला.
आठ दिवसांपासून गुरुप्रसाद कॉलनी, भवानी नगर, गोडशे वाडी, कावेरी कॉलनी,चन्नम्मा नगर आणि पार्वती नगर या भागात हे नेटवर्क सुरू करण्यात आले आहे. पहिल्याच टप्यात ८०० ते १००० कनेक्शन चा टप्पा पार झाला आहे. तसेच कपिलेश्वर कॉलनी, महाद्वार रोड, शहापूर, अनगोळ आणि चिदंबर नगर येथे लाईन टाकण्यात आली आहे, बेळगावच्या प्रत्येक भागात हे नेटवर्क आपली जादू पसरवणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
संपर्क मीडिया हा समूह केबल वितरण क्षेत्रातील मोठा समूह आहे, बंगळूर येथून त्याची कार्यवाही होते, चेन्नई आणि कर्नाटक व महाराष्ट्रात मोठे जाळे आहे. वरदराज नेटवर्क ने ग्राहकांना अद्ययावत डिजिटल चॅनेल आणि जोडीला इंटरनेट देण्याच्या दृष्टीने ही सोय आणली आहे, हे नवे तंत्रज्ञान असून आज नागरिकांच्या गरजेचे आहे, असेही राजेश जाधव म्हणाले.
बेळगावात सध्या असलेल्या इतर केबल सेवा इम्पॅक्ट टू या प्रकारच्या आहेत, ही नवी सेवा इम्पॅक्ट फोर एच डी डिजिटल आहे, यामुळे क्लिअरीटी उत्तम असेल याची नोंद घेणे गरजेचे आहे. तसेच येत्या चार दिवसात स्थानिक बातम्यांसाठी कन्नड आणि मराठी भाषेत दोन न्युज चॅनेल्स ही सुरू करण्यात येणार आहेत, याकडेही लक्ष दयावे असे आवाहन राजेश जाधव यांनी केले आहे.
टिळकवाडी येथील स्वरूप प्लाझा येथे वरदराज केबल चे कंट्रोल रूम बनवण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी 0831 2448996 किंवा 8884564911 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.