१ नोव्हेंम्बर काळ्या दिनाच्या निमित्ताने सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांनी जनजागृतीत आघाडी घेतली असताना नेत्यांनी शहरात जनजागृती सभा घेण्याकडे दुर्लक्ष केले आहे.आगामी विधानसभा निवडणूक केवळ सहा महिने दूर असताना शहराच्या दक्षिण भागात तुलनेने कमी सभा होत आहेत.
शहरातील समितीचे अनेक नेते ग्रामीण भागातील सभांना हजेरी लावत आहेत त्यामुळे मराठीचा बालेकिल्ला असलेल्या दक्षिण बेळगावात काळा दिन जनजागृती कडे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा होत आहे.
तालुक्यात दररोज दोन गावात सभा होत आहेत त्यात शहरातील अनेक नेते हजेरी लावत आहेत. समितीचे उपाध्यक्ष टी के पाटील यांनी केवळ बैठकीची औपचारिकताच पूर्ण केली असून गल्लोगल्ली फिरून जनजागृती करणे त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी टाळले आहे.
नुकताच चंदीगड दौरा आटोपून परतलेल्या महापालिकेच्या संधी साधू नगरसेवकांनी आपापल्या वार्डात सभा न घेता काळ्या दिनाच्या जनजागृती कडे दुर्लक्षच केले आहे.पुढील विधान सभेस शहरातील इच्छुकांनी शहरात काळ्या दिनाच्या जनजागृती कडे दुर्लक्ष केल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.