रेल्वे उड्डाण पुला जवळच्या प्रार्थना स्थळा जवळील बेकायदेशीर रित्या लावण्यात आलेल्या जाहिरात फलकावरून खासदार सुरेश अंगडी आणि कॅटोंमेंट सदस्यात शाब्दिक चकमक झाली होती.शुक्रवारी झालेल्या कॅटोंमेंट बोर्डाच्या सभागृहात झालेल्या बैठकीत ही शाब्दिक चकमक घडली.
या सभेत बोलताना अंगडी यांनी उड्डाण पुलाच्या शेजारील प्रार्थना स्थळा शेजारी झाड झुडपे वाढली असून जाहिरात फलकांची झाकून प्रार्थना करा याला कुणी विरोध करणार नाही असं म्हटलं असता कॅटोंमेंट सदस्यांनी याला आक्षेप घेत फालतू बोलू नका अस म्हटलं या विषयावरून दोघांत शाब्दिक चकमक घडली.
खासदार अंगडी यांनी या प्रार्थना स्थळा जवळील जाहिरात फलक काढा अशी सूचना अधिकाऱ्यांना केली.आमचा प्रार्थना करायला विरोध नसून जाहिरात फलकासह छावणी प्रमाणे झाकून ठेवणे संशयास्पद आहे त्यामुळे जाहिरात फलक काढा अशी मागणी त्यांनी केली.या अंगडी यांच्या भूमिकेस छावणी सीमा परिषदेच्या सदस्यांनी तीव्र विरोध केला यावेळी ब्रेगेडियर गोविंद कलवाड यांनी मध्यस्थी केली.
कॅटोंमेंट प्रदेश मिलिटरी व्याप्तीत येत असून सर्वांनी नियमांचं काटेकोरपणे पालन करणे गरजेचे असल्याचे सांगत कोणतेही बेकायदेशीर कृत्य चालू देणार नाही जाहिरात फलक बेकायदेशीर असून काढून टाकू अस स्पष्ट केलं यावेळी छावणी सीमा परिषदेचे मदन डोंगरे,साजिद शेख,सी इ ओ दिव्या शिवराम आदी उपस्थित होते