आमदार अरविंद पाटील यांचा एक फोटो सध्या वायरल केला जात आहे, ते कन्नड भाषिक किंवा मतदारांच्या बाजूने आणि मराठीच्या विरोधात असा समज पसरविण्यात येत आहे. मात्र हा फोटो तब्बल दोन वर्षे जुना असल्याचे उघड झाले असून समिती आमदारांची बदनामी करण्याचा घाटही उघड झाला आहे.
याबाबत बेळगाव live ने आमदार अरविंद पाटील यांच्याशी संपर्क साधला. खानापूर च्या पूर्व भागातून देखील मला म्हणजे खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीला पुढील निवडणुकीत भरघोस पाठिंबा मिळणार आहे. पूर्व भागातील लोक जरी कन्नड भाषिक असले तरी ते जातीने मराठाच आहेत यामुळे एक लोकप्रतिनिधी या नात्याने मी त्यांच्या सुखदुःखात सहभागी होणे हे कर्तव्य आहे असे ते म्हणाले.
उलट कन्नड भाषिक समिती आमदाराला मनाने बोलवतात हे महत्वाचे आहे, असे मत आमदार अरविंद पाटील यांनी बेळगाव live कडे नोंदवलं आहे
यापूर्वी गिस्टोली बिडी भागातून एकीकरण समितीला पाठिंबा होताच अनेक लोक जोडले गेले होते आता तोच पाठिंबा मी पुन्हा मिळवला आहे अस देखील आमदार पाटील म्हणाले.
आमदार या नात्याने मराठी, कन्नड सह मुस्लिम या सर्वांच्या कार्यक्रमाला जावे लागते. याचा अर्थ आमदार मराठी विरोधी आहेत असा होत नाही बेळगाव मध्ये मराठा क्रांती मोर्चात याच मुस्लिम बांधवानी पिण्याच्या पाण्याची सोय आणि अल्पोहार ची सोय केली होती त्यामुळे विरोध करणाऱ्यांनी विचार करावा असे देखील ते म्हणाले.
सोशल मीडियावर जो फोटो वायरल होत आहे तो दोन वर्षे जुना आहे. नंदगड येथील टिपू सुलतान जयंतीच्या निमित्ताने रक्तदान शिबिरातील आहे. मराठीच्या बाबतीत मी ठाम आहे, आणि हे खानापूर तालुक्यातील जनतेला माहीत असून ते विरोधकांच्या कुटील कारस्थानांना बळी पडणार नाहीत, असा विश्वासही आमदार अरविंद पाटील यांनी व्यक्त केला आहे.