बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील प्रमुख आरोपी , सध्या बेंगळूर येथील परप्पन अग्रहार कारागृहात मागील १३ वर्षांपासून शिक्षा भोगत असलेला एक कैदी तथा गोरगरीब आणि अनेकांचा मसीहा अब्दुल करीम तेलगी याचा बंगळूर येथे गुरुवारी निधन झालं आहे गुरुवारी चार वाजताच्या दरम्यान हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं आहे.
ज्या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्याने सम्पूर्ण देशात खळबळ माजली आणि त्यावर उपाय म्हणून भारत सरकारला ई स्टॅम्प चा पर्याय काढावा लागला त्याच घोटाळ्यात तेलगी प्रमुख भूमिकेत होता. अनेक राजकीय व्यक्ती आणि सरकारी अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्याने स्वतः छापलेले करोडो रुपयांचे स्टॅम्प देशभर खपविले होते.
हा आरोप सिद्ध झाल्यानंतर त्याला अटक झाली होती आणि नंतर शिक्षाही झाली होती, सध्या बंगळूर च्या परप्पन अग्रहार कारागृहात तो शिक्षा भोगत होता. प्रकृती बिघडल्याने त्याला इस्पितळात हलविण्यात आले होते, तेथेच त्याचा मृत्यू झाला आहे. बंगळूर च्या व्हिक्टोरिया हॉस्पिटल मध्ये त्याचा मृतदेह ठेवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसा पासून त्यांची स्थिती चिंताजनक होती