Tuesday, February 11, 2025

/

बेळगाव नगरपालिकेचे ब्रेन जयंतराव भोसले

 belgaum

बेळगाव सीमा प्रश्नाच्या चळवळीला 60 वर्ष उलटली तरी बेळगावकरांचं  हे दुखणं दूर झालेलं नाही या काळात असंख्य मराठी जणांनी त्याग करत हुतात्म्य पत्करल गोळ्या झेलल्या अनेक मोठ्या कुटुंबांची वाताहत देखील झाली तरी देखील इतका प्रदीर्घ काळ चाललेला हा एकमेव लढा होय.Jayant bhosle

अजूनही हा लढा तितक्याच त्वेषाने चालू असताना  प्रश्न सुटावा अशी आस असणारे एकेक लढवय्ये पडद्याआड होत आहेत. सीमा लढ्यात कायम आघाडीवर असलेली चव्हाट गल्लीतील जेष्ठ नागरिक पंच आणि तत्कालीन उपनगराध्यक्ष  जयंतराव भोसले यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. आजच्या या नव्या पिढीला अपरिचित असले तरी त्या काळी त्यांनी सीमा लढ्यात सिंहाचा वाटा होता.
याच चव्हाट गल्लीतील एक लढवय्या कार्यकर्ता पंच राणोजी रेडेकर यांच देखील दीड एक महिन्यांपूर्वी निधन झालं होतं या दोघांच्या निधन हा महाराष्ट्र एकीकरण समितीला मोठा धक्का मानला जात आहे.पूर्वीच्या परिस्थितीत आज झपाट्याने बदल होत असून कार्यकर्ते असंख्य असले तरी आज बिन्नीचे आणि लढाऊ कार्यकर्त्यांची उणीव समितीला भासते आहे.

त्या काळात जयंतराव भोसले यांनी एकीकडे सीमा लढ्याची धुरा सांभाळत असताना दुसरीकडे  बेळगाव नगरपालिकेवर मराठी भाषिकांची सत्ता देखील अबाधित ठेवली होती त्याला कोणत्याही प्रकारचा गालबोट लागू दिलं नाही त्यावेळी मराठी नगरसेवकांची संख्या कमी असताना देखील मराठीच वर्चस्व टिकवून ठेवलं होतं त्याकाळात स्थानिक कन्नड नेत्यांनी गट फोडण्याचा प्रयत्न केला होता मात्र भोसले यांनी हा आपल्या नेतृत्व शैलीने हा प्रयत्न यशस्वी होऊ दिला नव्हता.त्याकाळी नगराध्यक्ष म्हणून शिवाजीराव काकतकर हे नगराध्यक्ष तर भोसले हे उपगराध्यक्ष होते.
बऱ्याचदा सभागृहात विरोधी पक्षांच्या  लक्षवेधी सूचना हाताळणे,स्थगन प्रस्ताव, बैठक तहकूबी अश्या विषयावेळी नगराध्यक्षाना मोलाचा सल्ला देण्याचं काम जयंतराव करत होते ते काळी सर्वात अधिक वैचारिक शक्ती असलेले  जाणते नेते म्हणून परिचित होते बऱ्याचदा त्यांच्याच शब्द अखेरचा मानला जात होता.त्यांचं काम करण्याची पद्धत देखील अन्य नगरसेवकांच्या पेक्षा वेगळीच होती.छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवाजी उध्यानातील पुतळा, गोवा वेस मधील बसवेश्वरांचा तर आंबेडकर उध्यानातील डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा देखील त्यांच्याच काळात बसवला गेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.