बेळगावच्या पोस्ट ऑफिस मध्ये पासपोर्ट ऑफिस सुरू होण्याची प्रतीक्षा अध्याप थांबलेली नाही.जून अखेरीस सुरू होऊ घातलेले हे काम अध्याप प्रत्यक्षात आले नाही.
सध्या ऑक्टोबर महिना समाप्त होत आला असतांनाही.
९ फेब्रुवारी रोजी ही घोषणा झाली आणि पहिल्याच यादीत बेळगावचा समावेश करण्यात आला, आता एक माहिती हक्क अर्जानंतर हे स्पष्ट झाले आहे की या कार्यालयासाठी फर्निचर लागणार असून त्यासाठी निविदा काढली गेली आहे, मात्र एक महिना उलटला तरी काम काहीच नाही .
फर्निचर च्या नावाखाली वेळ काढण्यात येत असताना खासदार सुरेश अंगडी यांना याकडे पाहण्यास वेळ नाही. मुख्य पोस्टात पहिल्या मजल्यावरील जागा निश्चित करण्यात आली आहे, ईलेक्टरीकल दुरुस्ती व रंगकाम झाले आहे , आता फर्निचर मिळाले की काम सुरू होईल अशी आशा आहे.