Friday, December 20, 2024

/

काळ्या दिन महा मेळाव्यास परवानगी द्या -समिती शिष्टमंडळाने घेतली पोलीस आयुक्तांची भेट

 belgaum

Mes१ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या काळ्या दिनाच्या सायकल फेरीस आणि १३ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या महा मेळाव्यास परवानगी द्या या मागणीसाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त कृष्ण भट्ट यांची भेट घेऊन चर्चा केली.

सोमवारी दुपारी समिती अध्यक्ष दीपक दळवी यांच्या नेतृत्वात भट्ट यांच्याशी चर्चा करत मूक सायकल फेरी मार्गाची परवानगी मागितली. यावेळी कृष्ण भट्ट यांनी काकेरू चौकातील समस्या पाहता डी सी पी अमरनाथ रेड्डी यांच्याशी लवकरच चर्चा करून पाहणी करून सायकल फेरीचा मार्ग निश्चित करू आणि परवानगी देऊ अस आश्वासन दिल. यावेळी सरचिटणीस मालोजी अष्टेकर,प्रकाश मरगाळे,विकास कलघटगी महेश जुवेकर राजू मर्वे, राजू पावले आदी उपस्थित होते. १० नोव्हेंबर ला होणारी टिपू सुलतान जयंती तसेच १३ रोजी अधिवेशन आणि १ नोव्हेंबर काळा दिन यासगळ्या गोष्टी पाहूनच समितीच्या परवानगी बाबत निर्णय घेतला जाईल  असे देखील भट्ट यांनी स्पष्ट केल.

पालिका आयुक्तांची घेतली भेट

समितीच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेतल्यावर लगेचच महा पालिका आयुक्त शशिधर कुरेर यांची भेट घेऊन वक्सीन डेपो मैदान १३ नोव्हेंबर रोजी मेळाव्यास उपलब्ध करून ध्यावे अशी मागणी केली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.