गेल्या दहा वर्षात समितीतील दुहीमुळे ग्रामीण भागाला आमदारा पदा पासून वंचीत रहावं लागलं आहे त्यामुळे आगामी निवडणुकीत तालुक्यातील दोन्ही घटक समित्यांनी एकत्र येणे काळाची गरज आहे असा महत्वपूर्ण ठराव उचगाव येथील समिती कार्यकर्त्यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ कार्यकर्ते महादेव पाटील होते.समितीतील बेकीचा फायदा राष्ट्रीय पक्ष घेत आहेत याचा सारासार विचार झाला पाहिजे अश्या भावना यावेळी कार्यकर्त्यांनी मांडल्या.एकी होत असेल तर एकी नको म्हणणाऱ्या हेकेखोर नेत्यास बाजूला काढायची तयारी देखील असली पाहिजे असं मत व्यक्त करण्यात आलं.यावेळी सदानंद पावशे,मनोहर होनगेकर,अजित पावशे,लक्ष्मण लाळगे,विलास देसाई आदी उपस्थित होते.
तालुक्याच्या राजकारणात उचगावची बैठक महत्वाची मानली जाते उचगवात एकीचे सूर आल्यास ग्रामीण भागात देखील एकीचे सूर नक्कीच येतील यात शंका नाही