अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत दुचाकीस्वार दोघेजण ठार झाल्याची घटना पुणे बंगळुरू राष्ट्रीय राज मार्गावर वंटमूरी घाटात घडली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री साडे नऊ च्या दरम्यान हा अपघात झाला असून दुचाकी स्वार भीमराय हणमंत चौगुला वय 30 दुर्गाप्पा कऱ्याप्पा सनदी दोघेही रा.कटाबरी हुक्केरी अशी मयतांची नाव आहेत ते दोघेही दुचाकी वरून बेळगाव हुन हत्तरगी कडे जात होते त्यावेळी हा अपघात झाला आहे.अपघाताचा काकती पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे