1 नोव्हेंम्बर काळ्या दिना निमित्य बेळगावात होणाऱ्या सायकल फेरीत सहभागी होण्याचे स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष आणि काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी मान्य केले आहे.
पुणे येथे रविवारी शहर समितीच्या शिष्टमंडळा ने भेट घेऊन त्यांना काळ्या दिनाच्या सायकल फेरीत सहभागी होण्याची विनंती केली आहे.यावेळी मी काळ्या दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहू आणि सदैव सीमा वासीयांच्या पाठीशी रहाणार असल्याचे ठाम आश्वासन दिले. दीपक दळवी प्रकाश मरगाळे,मनोहर किणेकर,सुनील आनंदाचे यांचा राणे यांनी छावा पुस्तक देऊन कार्यक्रमाची रुपरेषा ठरविली.