गेल्या ९ बैठकांना वारंवार विनंती करून देखील अधिकाऱयांनी बैठकीची नोटीस सात दिवस अगोदर न दिल्याने अजेंडा विषय कल्पना येत नाहीत त्यामुळे चिडलेल्या ए पी एम सी सदस्यांनी बैठकीत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. यावेळी बैठकीत गोंधळ झाला त्यामुळे अध्यक्ष निंगाप्पा जाधव व्यतिरिक्त सर्व सदस्यांनी बैठकीतून सभात्याग केला त्यामुळे अधिकाऱ्यांना कोरम अभावी बैठक तहकूब करावीं लागली.
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची मासिक बैठकीचे रविवारी आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्वच सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरतवजन काटा खरेदी प्रकरणात भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला.
नियम नुसार बैठकीचा अजेंडा सात दिवस अगोदर नोटिशी द्वारे सदस्यांना बंधनकारक असतो मात्र अधिकाऱ्यांनी जाणून बुजून याकडे दुर्लक्ष केले आहे ९ महिन्यातील जमा खर्चाचा टिपण दिले नाही सव्वा तीन लाखांचा वजन काटा असताना ९ लाख खर्च दाखवून यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केळ्याचा आरोप ए पी एम सी सदस्य तानाजी पाटील यांनी केला आहे . जो पर्यंत सदस्यांना विश्वासात घेतलं जात नाही तोवर बैठक तहकुबीच करणार अशी भूमिका हि त्यांनी घेतली आहे
Trending Now