Monday, December 30, 2024

/

टिपू जयंती रद्द करा खासदार अंगडी यांची मागणी

 belgaum

कर्नाटकात निवडणुकीच्या तोंडावर टिपू सुलतान जयंती वरून राजकारण सुरु झाले आहे . अल्पसंख्याना खुश करून केवळ वोट बँकेसाठी राज्य सरकार टिपू जयंती साजरी करत आहे असा आरोप करत सिद्धरामय्या यांनी टिपू जयंती रद्द करावी अशी मागणी खासदार सुरेश अंगडी यांनी केली आहे.

बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्य सरकारला खरोखर अल्पसंख्यांकाची तळमळ असेल तर देशासाठी कार्य केलेल्यांची जयंती त्यांनी साजरी करावी माजी राष्ट्रपती डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांची जंयती सरकारने का साजरी करू नये सवाल देखील अंगडी यांनी यावेळी उपस्थित केला आहे .

Suresh angdi mp
थोर इतिहासकार चिदानंद मूर्ती पुरावे सादर करत टिपू सुलतान यांनी हिंदूंची कत्तल केली असल्याची इतिहासात नोंद आहे टिपू सुलतान यांनी हिंदू विरोधी कृत्य केला असल्याचा आरोप केला आहे. जिल्हा प्रशासनाला टिपू जयंती कार्यक्रमात माझं नाव सामील करू नये अशी विनंती देखील केली असल्याचे ते म्हणाले .

 belgaum

1 COMMENT

  1. Dear all
    Aequs company ne 300 workers ko illegal terminate kiya to koi bjp neta workers ko support nahi kiya na Media ne WO log aaj bhi ek waqt ka khana ke liye Tara’s rahe he plz aap aawaz uthavo

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.