गेल्या महिन्याभरात जिल्हाधिकारी निवासात एकदा दोनदा नव्हे तर तब्बल तीनदा सर्प आढळले आहेत त्यामुळे डी सी बंगला की सर्पघर अशी चर्चा सुरू झाली आहे.
गेल्या महिन्याभरात एकदा एक तर एक दोन सर्प सापडले होते सर्प मित्र आनंद चिट्टी आणि निरझरा चिट्टी यांनी ते पकडून त्यांना जीवनदान देखील दिलं होतं मात्र शनिवारी झालेल्या बंगल्यातील साफ सफाईत धामण सर्प देखील सापडला आहे.सर्प मित्र आनंद चिट्टी यांनी त्या सर्पास पकडून जीवनदान दिले आहे.यावेळी जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांचे चिरंजीव जुनेद आणि कन्येने देखील हा सर्प हाताळला चिट्टी यांनी डी सी यांच्या परिवारास आणि कर्मचाऱ्यांना सापाविषयी माहिती दिली.
दोनदा सर्प आढळल्याने डी सी बंगल्यातील कर्मचारी भीतीच्या छायेखाली होते त्यामुळे साफ सफाई मोहीम हाती घेण्यात आली होती त्यात हा धामण सर्प नजरेस आला त्यानंतर सर्प मित्रांना बोलावून त्यांच्या हवाली हा सर्प करण्यात आला आहे