स्वतःची प्रगती झाली की आपल्यापुरतेच मर्यादित राहून अलिप्त होणारे बरेचजण असतात . रवी शेठ यापैकी नाही. फक्त टीव्ही ला गुरू करून डान्सर झालेला आणि पुढे कोरिओग्राफर पर्यंत मजल मारलेला बेळगावचा रवी आज अनेक डान्सर घडवत आहे. ज्योतीने ज्योत पेटविण्याचेच त्याचे काम कौतुकास्पद आहे.
रवी शेठ हा बेळगावचा मुलगा. लहानपणी पासून त्याला नृत्याचा छंद, घरी टीव्ही बघून तो हा छंद जपत गेला. एक अपघात झाला आणि त्याला डॉक्टर ने कधीच नृत्य करू नकोस असा सल्ला दिला, मात्र तो हटला नाही, त्याने सराव सुरूच ठेवला कारण नृत्या शिवाय तो जगूच शकत नव्हता.
पुढे बरा झाल्यावर त्याने हैद्राबाद आणि चेन्नई मध्ये जाऊन तेलगू आणि तमिळ स्पर्धात भाग घेतला आणि तो लकी ठरला.
त्यांनतर त्याने मागे वळून पाहिले नाही. आज fusion ग्रुप ला घडवून त्याने आपली कला वाटण्याचे ध्येय ठेवले आहे. जिद्द, चिकाटी आणि परिश्रम त्याला उच्च शिखरावर घेऊन जात आहेत.
Trending Now