मराठी अस्मितेच प्रतीक असलेल्या येळ्ळूर गावात कृषी पत्तीनं संस्थेच्या उदघाटन कार्यक्रमास माजी पालकमंत्र्यांना आमंत्रण दिल्याने गावात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
येळ्ळूरच्या वेशीवरील महाराष्ट्र राज्य फलक हटवल्या नंतर पोलिसांनी मराठी जनतेला केलेल्या मारहाणीच्या जखमा ताज्या असतानाच येळ्ळूर समितीच्या एका गटाने तात्कालीन पालकमंत्र्यांना आमंत्रण दिल्याने येळ्ळूर सह सीमाभागात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
27 जुलै 2014 च्या काळात तात्कालीन पालकमंत्र्यांच्या कारकिर्दीत फलक हटवून मारहाणीची घटना घडली होती या निमित्ताने येळ्ळूरात सत्कार होणार आहे या कार्यक्रमात तालुका आणि शहर समितीतील अनेक नेते देखील उपस्थित राहणार आहेत आमंत्रण पत्रिकेत समिती नेत्यां सोबत माजी पालकमंत्री आणि काँग्रेस नेत्यांची देखील नाव आहेत. येळ्ळूर हे गाव सीमा लढ्याच मुख्य केंद्र बिंदू आहे जे येळ्ळूर मध्ये पिकतंय ते सीमाभागात उगवंतय अशी स्थिती असताना राष्ट्रीय पक्षातील नेत्यांना आमंत्रण देऊन समिती नेत्यांनी त्यांच्याशी सलगी वाढवणे कितपत योग्य आहे? अरे कुठे नेऊन ठेवताय येळ्ळूर माझा…असच सीमा लढ्यातील हुतात्मे म्हणत नसतील ना??