बेळगावच्या सबरजिस्ट्रार खात्यात सध्या मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. शहापूर बसवाण गल्ली येथील बिर्जे नामक व्यक्तीला याचा अनुभव आला आहे.
या व्यक्तीने दि 4 ऑक्टोबर रोजी रीतसर 12 वर्षाचे बिनबोज्या सर्टिफिकेट देण्याकरिता sdm कुरयार या अधिकार्यांकडे अर्ज केला होता , अवघ्या 200 रुपयांची मागणी साठी या इसमाला फेऱ्या माराव्या लागत आहेत. काहीजण दिवसादिवसी 200 रुपये देऊन सर्टिफिकेट घेऊन जात आहेत.
सामान्य जनता यात कमी पडत आहे आणि एजेंट पैसे कमवत आहेत.cctv बंद आहे सामान्य जनतेकडून शासकीय कार्यालयातून होणारी लूट जिल्हाधिकारी थाबविणार का ? हा प्रश्न विचारला जात आहे. बेळगावात सामान्य जनता या शासकीय कार्यलयाला वैतागली आहे.