महापालिकेच्या कंग्राळी हद्दीतील कचऱ्याची उचल करा अशी मागणी जिल्हा पंचायत सदस्या सरस्वती पाटील कंग्राळी ग्रामस्थांनी उपमहापौर नागेश मंडोळकर यांच्या कडे केली आहे.गेले कित्येक दिवस महा पालिका कार्यक्षेत्र असलेल्या कंग्राळी येथे अनेक ठिकाणी कचऱ्याची उचल होत नसल्याने दुर्गंधी पसरलेली आहे याचा त्रास नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे त्यामुळं पालिकेने या कचऱ्याची देखील उचल करावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.यानंतर उपमहापौर नागेश मंडोळकर यांनी पर्यावरण अधिकारी उदयकुमार यांना बोलावून दखल घेऊन कचरा उचल करा अश्या सूचना दिल्या.यावेळी आर आय पाटील चेतक कांबळे यल्लप्पा पाटील ,तुकाराम चौगुले परशराम चिखलीकर आदी उपस्थित होते.
Trending Now
Less than 1 min.