विना परवाना सुरू असलेला बियर बार तात्काळ बंद करा अशी मागणी करत कुद्रेमानी येथील सावित्रीबाई फुले महिला मंडळाच्या महिलांनी जिल्हाधिकाऱ्या समोर निदर्शन केली.
सोमवारी सकाळी कुद्रेमानी ग्रामस्थ आणि शेकडो महिलांनी गावातील बियर बार बंद करा अशी मागणी करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
कुद्रेमानी येथील बियर बार बंद करावा परवानगी देऊ नये असा ठराव ग्राम पंचायतीन ग्राम सभेत मांडला असून अद्याप या बार परवानगी नसताना देखील बार सुरू करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून हा बार बंद करावी अशी मागणी केली आहे.यावेळी सावित्रीबाई फुले मंडळाच्या डॉ सरिता गुरव ग्राम पंचायत अध्यक्ष सदस्य उपस्थित होते.माजी आमदार मनोहर किणेकर,आर आय पाटील,भागोजी पाटील आदी उपस्थित होते.