1नोव्हेम्बर काळा दिन गांभीर्याने कडकडीत पाळू आणि हजारोच्या संख्येने मूक सायकल फेरीत सहभागी होऊ तसेच 13 नोव्हेंबर रोजी कर्नाटक अधिवेशना विरोधी मेळावा सरकार परवानगी देऊ अथवा न देऊ यशस्वी करूच अस ठाम विश्वास मध्यवर्ती समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनी व्यक्त केला
रंगुबाई पॅलेस येथे शहर समितीच्या बैठकीत ते बोलत होते.यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी वेगवेगळे विषय सूचना मांडल्या .मेळावा यशस्वी करुन काळा दिन गांभीर्याने पाळा असा ठराव देखील करण्यात आला.
बैठकीत कार्यकर्ते अनेक प्रश्नांचा भडिमार करत होते त्यावेळी कार्यकर्त्यांना मध्यवर्ती अध्यक्ष दीपक दळवी,सरचिटणीस मालोजी अष्टेकर खजिनदार प्रकाश मरगाळे उत्तर देत होते अनेकदा दळवी उत्तर देताना कोर्टाच्या कामकाजाची माहिती देताना भावना विवश होत होते डोळ्यातून अश्रू काढत होते.
कोणीही येऊन काम करावं..मालोजी
समिती सर्वपक्षीय सीमा भागातील मराठी जनतेच प्रतिनिधित्व आहे कुणालाही समितीतून काढलेल नाही त्यामुळे कोणीही समितीत येऊन काम करावं असा सल्ला मालोजी अष्टेकर यांनी सर्वांना दिला आहे.दळवी शहर समितीचे अध्यक्ष असा कोणता ठराव झाला आहे का झाला असेल तर सरचिटणीस मालोजी अष्टेकर यांनी वाचवून दाखवावा अशी मागणी मदन बामणे यांनी केली त्यावर मालोजी अष्टेकर यांनी मार्च 2013 मध्ये झालेल्या सर्व बैठकांचे ठराव वाचून दाखवले 2013 च्या त्या बैठकीत किरण ठाकूर हे अध्यक्ष तर दीपक दळवी हे कार्याध्यक्ष आणि इतर पदाधिकाऱ्यांची नाव आहेत मार्च 2013 नंतर दुसरा कोणताही ठराव झालेला नाही असे त्यांनी स्पष्ट केले