जगात सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात जनतेच्या भावनांची कदर केली जात नाही तमा बाळगली जात नाही त्या देशाची लोकशाही दुबळी आणि कमकुवत असते 60 वर्षात सीमा प्रश्न न सुटणे म्हणजे भारतीय लोकशाहीच्या चेहऱ्यावरचा काळा डाग आहे असं मत समितीचे निष्ठावंत कार्यकर्ते दीपक पावशे यांनी व्यक्त केले आहेत. तालुका समितीच्या वतीने काळा दिन मेळाव्याच्या बैठकीत बोलताना व्यक्त केले आहेत.
मला फक्त सीमा प्रश्नाच्या बाबतीत या लोकशाहीवर टीका करायची नाही आहे इतर राष्ट्रांची लोकशाही काय आहे याच्यात जमीन आस्मानच चा फरक आहे.दीड वर्षांपूर्वी तुर्की ने ज्यावेळी रशियाच विमान पाडलं त्यावेळी रशियाने प्रत्त्युत्तर देताना त्यांच्या वर बॉम्ब हल्ले करून सळो की पळो करून टाकलं प्रत्येक राष्ट्र हे असंच करत असत फक्त अपवाद आहे तो भारताचा….जर भारतीय जवानांनी एखाद्या दशहत वाद्यांचा खात्मा केला तर त्या दशहत वाद्यांचे समर्थक रस्त्यावर उतरतात अन सरकारला वेठीस धरतात मग सरकार एक फतवा काढत …100 जवान मेले तरी चालतील परंतु एकही दशहत वादी मरता कामा नये अश्या लोकशाहीला आपण काय समजावं? असा प्रश्न देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.
बेळगाव सीमा प्रश्ना साठी रस्त्यावरच्या लढाया करत असताना अनेकांनी अन्याय सोसलेत त्यांनी या भारतातील राज्यकर्त्यांना दाखवून दिलं आहे की बेळगावातील मराठी भाषिक म्हणजे एक जीवंत अस स्वतंत्र राष्ट्रच आहे.आम्ही मराठी भाषिक नायक आहोत तर निद्रास्थित राज्यकर्ते भयंकर मोठं शून्य आहेत अस देखील त्यांनीं पुढे नमूद केलं.
एक नोव्हेंम्बर1956 साली सीमाभागातील मराठी जनेतला आपल्या ओळखीच्या भाषेच्या प्रदेशात जाऊन आपली उन्नती प्रगती करण्यापासून रोखण्यात आला आणि अन्याय सहन न झाल्याने अनेकांनी आपल्या जिवाच बलिदान दिले.हुतात्म्यांच्या बलिदानाचा स्मरून आजही जनता सीमा प्रश्नाच्या बाजूनी आहे. मराठी जनतेनं आपल्या हृदयाशी जपलेल्या समाजकल्याण कारी सीमा प्रश्नाला न्याय मिळवूया या 60 वर्षाच्या कालावधीत हा प्रश्न का सुटला नाही हा सगळ्यांनाच पडलेला प्रश्न आहे असंही ते म्हणाले. लोकशाहीच्या यशस्वीपणाची ठीमकी वाजवणाऱ्या शेतकरी आणि मराठी माणसाच्या या समस्या सरकारला कधी कळणार असा खडा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.