विधानसभा अध्यक्ष बी जी कोळीवाड यांनी बेळगावात पुढील महिन्यात होणाऱ्या हिवाळी अधिवेशनाची पूर्व तयारी बैठक सुवर्ण विधान सभेत घेतली. शनिवारी ते बेळगाव दौऱ्यावर होते.दोन्ही सभागृहाचे कार्यदर्शी,जिल्हाधिकारी यांच्या सह विविध खात्याच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीत सहभाग घेतला होता.
13 नोव्हेंम्बर पासून दहा दिवसीय अधिवेशन बेळगावातील सुवर्ण विधान सौध होईल अशी माहिती यावेळी कोळीवाड यांनी दिली.
बैठकीत अधिवेशन यशस्वीरीत्या आयोजन करण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.आवास परिवाहन जेवण स्वच्छता आणि बंदोबस्त याच्या तयारीसाठी सूचना देण्यात आल्या आहेत असं देखील त्यांनी सांगितलं.
राष्ट्रपतींचं होणार अभिभाषण
25ऑक्टोम्बर रोजी सकाळी 11 वाजता विधानसभेच्या डायमंड वर्ष पूर्ती निमित्य राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच अभिभाषण होणार असल्याचे देखील कोळीवाड म्हणाले.यावेळी विधान परिषद सभापती डी एच शंकरमूर्ती, कार्यदर्शी के आर महालक्ष्मी,सह अन्य अधिकारी उपस्थित होते.