पावसाळ्यात सुरक्षेच्या कारणासाठी बंद करण्यात आलेला दूधसागर धबधबा गोवा वनविभागाने आता पुन्हा एकदा अधिकृतपणे पर्यटकांना खुला केला आहे.
रेल्वे खात्याने कॅस्टल रॉक ते धबधबा असे ट्रेकिंग करण्यावर बंदी घातली आहे त्यामुळे गोव्यामार्गे हा रस्ता हा एकच पर्याय पर्यटकांना आहे.
वनविभागाने यासाठी जीप उपलब्ध करून दिल्या असून त्या एका जीपमध्ये ७ जण बसू शकतात. प्रत्येकासाठी ४०० रुपये तिकीट असेल. घनदाट अरण्य आणि कच्चा रोड अशी स्वारी लाभणार आहे.
कोलम ते दूधसागर असा हा १२ किमी प्रवास असेल.हा प्रवास दररोज सकाळी ८.३० ते सायंकाळी ६ पर्यंत उपलब्ध होणार आहे.
Trending Now