राज्य सरकारच्या महत्वपूर्ण आणि यशस्वी झालेली एक योजना इंदिरा कॅन्टीन गरिबांना जेवण देणारी ही योजना बेळगावात देखील सुरू करण्यात येणार असून बेळगावात सहा ठिकाणी ही योजना सुरू करण्यात येणार आहे.
महा पालिकेला या इंदिरा कॅन्टीन साठी जागा शोधून एका आठवड्यात अहवाल पाठवा अशी सूचना करण्यात आली आहे.
ए पी एम सी रोड खानापूर रोड कॉलेज रोड कणबर्गी रोड ,कोर्ट आवार, उध्यमबाग, सिटी बस सथानीकआदी सह हे इंदिरा कॅन्टीन सुरू होऊ शकते.एकदम कमी किंमतीत गरिबांना जेवण देणे हे इंदिरा कॅन्टीन चे वैशिष्ट्य असून बंगळुरू मध्ये ही योजना कमालीची लोकप्रिय झाली आहे.या कॅन्टीन मध्ये जेवणासोबत फास्ट फूड,डिनर देखील स्थानिक लोकांना कमी किंमतीत मिळणार आहे.
ठराविक वेळेत ठरलेला मेनू बनवून वितरित करण्यात येतो यासाठी नाश्ता सकाळी 7 ते 9:30तर दुपारी 12:30 ते 3:00 दुपारचं जेवण,रात्री 7:30 ते 9:०00 रात्रीच जेवण वितरित करण्याची वेळ असणार आहे.
.