घटनेने दिलेल्या अधिकाराप्रमाणे मागणि करणाऱ्या तालुका पंचायत सदस्यांना उद्देशून तालुका पंचायत अध्यक्ष शंकरगौडा पाटील यांनी एक वादग्रस्थ वक्त्यव्य केले आहे. गुरुवारी तालुका पंचायतीच्या सर्वसाधारण बैठकीत त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
आमच्या भाषेत आम्हाला उतारे आणि कागदपत्रे देण्यास सुरुवात करनार कि नाही असा प्रश्न सदस्य सुनील अष्टेकर यांनी विचारल्यावर अध्यक्ष शंकर गौडा पाटील यांनी जास्त प्रश्न विचाराल तर पोलिसांना बोलावून जेल मध्ये घालू अस वक्तव्य केले आहे.
गेली २ वर्षे झाली तालुका पंचायत चे काम सुरळीत चालत नसून बैठक होत नाहीत आहे आमचे विचार ऐकायचे नसेल आम्हाला गोट्या खेळण्यास बोलवताय का? असा संतप्त सवाल सदस्य अपासाहेब कीर्तने यांनी केला
यावेळी अधिकारी बैठकीत उपस्थित नसतील तर त्यांचे वर कारवाई करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला.अध्यक्ष हे पक्ष आणि आपले जवळीक असलेले सदस्य ओळखून निधी वाटप करत असल्याचा आरोप काहींनी केला त्यामुळे सभागृहात गोंधळ झाला मग काही सदस्यांनी सभात्याग केला.