सध्या विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष उमेदवारांची पडताळणी करत आहेत.काँग्रेस पक्षानेही ही चाचपणी सुरू केली असून सध्यातरी कोणताच प्रबळ उमेदवार दिसलेला नाही अशी माहिती समोर आली आहे.
काँग्रेसकडे इच्छूक फार आहेत, पण निवडून येतील असे उमेदवार नसल्याने त्यांना उभे करणे म्हणजे नुकसान अशी चर्चा आहे, चुकीचे पदाधिकारी निवडून काँग्रेसने आधीच घोळ घातला आहे त्यात एकही चांगला चेहरा मिळेना झाल्याने वरिष्ठांनी उमेदवार बाहेरुन आयात करण्याचा विचार सुरू केला अशी माहिती आहे.
सध्या समितीचे आमदार संभाजी पाटील यांना विशेष निधी दिल्यावरून सर्वत्र चर्चा सुरू आहे.
पक्षात चांगला चेहरा नसल्याने सिद्धरामय्या यांनी संभाजी पाटील यांचे हात बळकट करण्याचा प्रयत्न केला असल्याचाही अंदाज आहे. यामुळे काँग्रेस मधील इच्छुकांचेही धाबे दणाणले आहेत.
मागिलवेळच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अनिल पोतदार यांनी 20 हजार मते घेतली होती, यामुळे यंदा सर्वप्रथम त्यांचा विचारही करणे गरजेचे आहे.
उत्तर ,ग्रामीण व खानापुरात जसा काँग्रेस उमेदवार प्रबळ आहे तसं दक्षिण बेळगावात का नाही ? महाराष्ट्र एकीकरण समिती आणि भाजपच्या वर्चस्वाच्या
स्पर्धेत काँग्रेस कुठं हरवली आहे काय असा प्रश्न सध्या वरिष्ठांना पडला आहे.
एकेकाळी उचगाव ब्लॉक असताना संजय सातेरी ,युवराज कदम ,डॉ रै यांनी पक्ष मजबूत केला होता समितीला बऱ्या पैकी आवाहन दिल होत मात्र सध्या वरील तिघांतले कोणीच दक्षिण मध्ये कार्यरत नाहीत.संजय सातेरी समितीत, डॉ राय राजकीय निवृत्त तर युवराज कदम ग्रामीण मध्ये ऍक्टिव्ह आहेत त्यामुळे आता ते दिवस नाहीत.या सगळया गोष्टींचा विचार केला असता काँग्रेसचा दक्षिणेतील चेहरा कोण? हे स्पष्ट नाही.