विकासाच्या नावाखाली सावली देणाऱ्या झाडांची कत्तल सुरू आहे. खडेबाजार पाठोपाठ हुतात्मा चौकातील झाडेही काढली गेली. यामुळे डोळ्याला दिसणारी हिरवाई गेली आणि भकासपणा आला, यामुळे बेळगावातही ‘विकास’ येडा झालाय की काय असा प्रश्न सामान्य माणसाला पडलाय.
रस्ता रुंदीकरण आणि त्यासाठी झाडांची कत्तल या प्रकारात सध्या बेळगाव शहर पुरते भकास होत आहे. वृक्ष तोडून प्रशासनाने शहर स्मार्ट की भकास बनवण्याचा चंग बांधला आहे. मागील पाच ते सहा वर्षात रस्ते मोठे करण्याच्या नादात ३ ते ४ हजार वृक्ष तोडून टाकण्यात आले, इतकी वर्षे शहराबाहेरची झाडे तोडून झाली आता प्रशासनाने आपला मोर्चा शहराच्या आतील भागाकडे वळवला आहे.
हुतात्मा चौकातील झाडे तोडून प्रशासनाने तर अनेकांची सावली हिरावून घेतली असून त्याचे तीव्र पडसाद व्यक्त होत आहेत.