पहिली मुलगी दत्तक घेतलेली असताना देखील अनिवासी भारतीयांना दुसरी मुलगी दत्तक घेता येते असा महत्वपूर्ण आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने दिला आहे . बेळगावच्या जिल्हा न्यायालयाने पहिली मुलगी दत्तक घेतलेली असताना दुसरी मुलगी दत्तक घेता येणार नाही म्हणून अमेरिकेत वास्तव्य करणाऱ्या सी .वर्गीस यांचा विनंती अर्ज फेटाळला होता . उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाचे न्या . श्रीनिवास हरीश कुमार यांनी दिलेला हा निकाल संपूर्ण देशात ऐतिहासिक असाच आहे ,अशी माहिती वकील संग्राम कुलकर्णी यांनी दिली . वर्गीस यांच्यावतीने संग्राम कुलकर्णी यांनीच पुनर्विचार याचिका दाखल केली होती .
दत्तक देणारी संस्था स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान आणि सी . वर्गीस या दाम्पत्याने दत्तक विधीसंबंधी कायदेशीर परवानगी घेण्यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता . पण जिल्हा न्यायालयाने पहिली मुलगी दत्तक घेतलेली असताना दुसरी मुलगी दत्तक घेता येणार नाही असा निवाडा दिला होता . या निर्णया विरोधात सी . वर्गीस दाम्पत्याने कर्नाटक उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाकडे पुनर्विचार याचिका दाखल केली होती