सगळीकडे दुतोंडी साप समजला जाणारा एकतोंडी साप मंडोळ आज सर्पमित्र आनंद चिठ्ठी यांनी पकडला. प्रत्यक्ष दाखवून या दोन तोंडांबद्दलचे गैरसमज त्यांनी दूर केले.
संकम हॉटेल भागात गेल्या काही दिवसांपासून हा साप दिसत होता. हॉटेलचे मॅनेजर हितेश पटेल यांनी चिठ्ठी यांना बोलावून घेऊन तो दाखवला. चिठ्ठी यांनी तो पकडून जागृतीही केली.
हा साप दोन्ही बाजूंनी एकाच पद्धतीचा दिसतो मात्र एका बाजूला मुख आणि दुसऱ्या बाजूला गुदद्वार असते, तरीही काहीजण हा साप यशाचा मार्ग असल्याचे सांगून विकतात आणि लाखोंची फसवणूक करतात ही गोष्ट समजावून सांगण्यात आली.
आता हा साप वनविभागाच्या मदतीने सुरक्षित ठिकाणी सोडण्यात येणार आहे.