दसरा आणि दिवाळीला नैऋत्य रेल्वेने हॉलिडे स्पेशल सोडावी ही मागणी केली होती. दसऱ्याला ही रेल्वे सोडून मागणी मान्य झाली, आत्ता दिवाळी काळातही आणखी हॉलिडे स्पेशल सोडण्यात येणार आहे. सिटीझन कौन्सिल चा हा विजयच आहे.
कौन्सिलचे अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांनी नैऋत्य रेलच्या मुख्य कमर्शियल मॅनेजर यांची भेट घेऊन ही मागणी केली होती.
यशवंतपूर बेळगाव यशवंतपूर असे या रेल्वेचे स्वरूप असणार आहे.रेल्वे क्र 06581 आणि 06582 या सेवा देणार आहेत. यापैकी पहिली रेल्वे मंगळवार दि १७ रोजी रात्री ८.१५ वाजता यशवंत पूर इथून सुटून बुधवार दि १८ ला बेळगावला पोचणार आहे.
रविवार दि २२ रोजी सायंकाळी ५.२० वाजता बेळगावहून सुटून सोमवार दि २३ रोजी पहाटे ५ वाजता यशवंतपुरला पोचेल. दोन्ही प्रवासात लोंढा, धारवाड, हुबळी, हावेरी, हरिहर, दावनगिरी, बिरुर, आर्शिकेरे, तुमकुर या स्थानकांवर ती थांबेल.
दिवाळीच्या निमित्ताने ये जा करणारे नागरिक यांना या सेवेचा लाभ घेता येईल.
Trending Now