जुने गांधीनगर भागात पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अपुरा आहे. पाणी सोडण्याचे नियोजन बिघडले आहे. यासाठी या भागातील नागरिकांनी आज मनपावर धडक मोर्चा काढला. पाणी पुरवठा सुरळीत करा अशी मागणी करण्यात आली.
या मोर्चात नागरिक मोठ्याप्रमाणात जमले होते. सध्या ५ ते ६ दिवसातून एकदा पाणी येत आहे. ते पुरेसे नसते त्यामुळे त्रास होत आहेत. मनपाने पाणीपुरवठा मंडळाला योग्य सूचना द्याव्या, अशी मागणी निवेदन देऊन करण्यात आली आहे.