Thursday, January 23, 2025

/

 उत्तर मतदारसंघात रामसेनेच्या कोंडुसकरांच नाव आघाडीवर-वाचा प्रशांत बर्डे यांचा लेख

 belgaum

Bjp logoउत्तर मतदार संघात आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून इच्छुक उमेदवारांत एकमेकांत चढाओढ सुरू आहे.निवडणूक केवळ सहा महिन्यावर येऊन ठेपली असताना बेळगाव उत्तर मतदार संघातील राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे.सद्या स्थितीत भाजपकडून किरण जाधव अनिल बेनके डॉ रवी पाटील,विरेश किवडसन्नावर आणि राम सेनेचे रमाकांत कोंडुस्कर आदी इच्छुक आहेत. मुस्लिम बहुल भागात हिंदुत्ववादी संघटनांशी अधिक जवळीक असलेल्या कोंडुस्कर यांच्या नावाला गंभीर विचार सुरू आहे.

मागील विधानसभेत पराभव झाल्या नंतर किरण जाधव यांनी उत्तर बेळगावात भाजप बळकटीसाठी जोरदार प्रयत्न चालवले आहेत महाराष्ट्राचे सहकारी मंत्री सुभाष देशमुख आणि स्थानिक संघाचा पाठिंबा घेऊन यावेळी आपणास उमेदवारी मिळावी यासाठी  ते प्रयत्नशील आहेत. तर गेल्या निवडणुकीत पक्षाने तिकीट नाकारल्याने यावेळी संधी मिळेल या अपेक्षेने अनिल बेनके यांनी आपल्या सामाजिक कामाचा धडाका चालूच ठेवला आहे.क्षत्रिय मराठा परिषदेच्या माध्यमातून लोकप्रियता मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत तिकिटासाठी वेगवेगळ्या पद्धतीनं  ते लॉबिंग करताना दिसत आहेत.
अलीकडेच डॉ रवी पाटील यांनी आपला डॉक्टरी पेशा सांभाळत उत्तर मतदार संघातअनेक वैधकिय शिबीर भरवून जनमानसात आपली प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न चालवला आहे गेल्या दोन वर्षात विविध सामाजिक शैक्षणिक संस्थाना उदार देणग्या देऊन आपली छबी चमकवण्याचा देखील त्यांचा प्रयत्न दिसतो इतकंच नव्हे तर बैलहोंगलचे आमदार जिल्हा भाजप अध्यक्ष डॉ विश्वनाथ पाटील यांच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष बी एस येदूरप्पा यांच्याशी त्यांनी जवळीक वाढवली आहे .लिंगायत कोट्यातून उमेदवारी साठी विरेश किवडसन्नावर प्रयत्न करताना दिसत आहेत.

उत्तर विधानसभा मतदार संघ सध्या कोणत्याच राजकीय पक्षाला पूरक नसल्याने अनेक जण इथून इच्छुक आहेत.या मतदार संघावर मुस्लिम अल्पसंख्याक मतांच प्राबल्य आहे हे कोणी नाकारू शकत नाही.  आतापर्यंत या ठिकाणी दोन हिंदू उमेदवार असल्याने हिंदुत्व वादी मतांची विभागणी होऊन त्याचा फायदा उर्दू भाषिक उमेदवाराला झाला आहे त्यामुळे या उर्दू भाषिक उमेदवाराचा पराभव करण्यासाठी हिंदुत्ववादी आणि मराठी भाषिक एकत्रित आल्यास हे  सहज शक्य आहे याची जाणीव भाजप हायकमांड ला झाली आहे त्यासाठीच एकच हिंदू उमेदवार देऊन ही लढाई जिंकण्याचा प्रयत्न भाजप नेत्यांनी चालवला आहे. राम सेनेच्या माध्यमातून हिंदुत्वासाठी कार्य करत असलेले आणि मराठी भाषिक असलेले,कन्नड मराठीशी जवळीक असलेल्या रमाकांत कोंडुस्कर यांना उत्तरेतील उमेदवारी देण्या बाबत विचार सुरू झालेला आहे.

विशेष म्हणजे केंद्रीय कौशल्य विकास राज्य मंत्री अनंतकुमार हेगडे यांना उत्तर मतदार संघाचा प्रभारी नेमताना उत्तर कर्नाटकातील हिंदुत्ववादी मतदार संघाचा प्रभाव असलेल्या 24 मतदार संघाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवण्यात आली आहे त्यामुळं अलीकडे बेळगावच्या धावत्या दौऱ्यावर असताना त्यांनी उत्तर मतदार संघात कोण उमेदवार असावा याची चाचपणी केली आहे. इच्छुक पाच पैकी  उमेदवारातून रामसेनेच्या रमाकांत कोंडुस्कर यांच्या नावाला पसंदी दिली असल्याचे विश्वसनिय सूत्राकडून समजते.त्यामुळे इच्छुकांत रमांकांत यांचे नाव आता देखील जोडले गेले आहे.
मागील दोन वेळचा निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता मराठी आणि हिंदुत्ववादी मतांचो गोळाबेरीज एकत्र करून उत्तर भाजपचा विजय सोपा मानला जात आहे त्या दृष्टीने पक्ष श्रेष्टींनी काम करायला सुरुवात केली आहे.

 belgaum

2 COMMENTS

  1. ऊत्तर मतदार संघात रमाकांत कोंडुसकर राम सेनेचे यांचे नाव हिंदूत्ववादी म्हणून घेतले जात आहे पण त्या अगोदर याचा विचार करा कि फिरोज का व कसे निवडून आले.
    मागचा विचार करता त्या वेळेला राम सेनेचे ऊमेदवार विलास पवार यांच्यामूळेच. त्या मूळे हिदूत्ववादी कोण याचा विचार करावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.