सध्या सहकार क्षेत्रात एकच चर्चा आहे संगोळ्ळी रायन्ना सोसायटीच्या घोटाळ्याची. या सोसायटीने फसवले म्हणजे बाकीच्या सगळ्या सोसायट्या फसवणार असा समज करून घेऊन त्या सोसायट्यांमध्ये ठेवलेल्या ठेवी परत घेण्यासाठी सर्व नागरिक तुटून पडत आहेत. असुरक्षिततेची भावना तयार होऊन ही स्थिती निर्माण झाली असली तरी आपल्या या कृतीने सारे सहकार क्षेत्रच अडचणीत येऊ शकते याचे भान ठेवावे लागेल.
एका अप्पूगोळ ने फसवले म्हणून सर्व सोसायट्यांवर अविश्वास दाखवणे कितपत योग्य आहे? बेळगाव शहर आणि परिसरातल्या अनेक सोसायट्या ग्राहकांच्या अविश्वासाचा बळी ठरत आहेत. अनेक ठेवीदार आपण ठेवी ठेवलेल्या सोसायटीत जाऊन आपल्या ठेवी परत मागत आहेत, अशामुळे सरळ चालणाऱ्या सोसायट्याही अडचणीत येऊ लागल्या आहेत.
सभासदांनी ठेवलेल्या ठेवी सोस्यत्यांना गुंतवाव्या लागतात. या ठेवी मुदत सम्पतांना परत करण्याचे एक गणित ठरलेले असते. प्रत्येक महिन्यात मुदत पूर्ण होणाऱ्या ठेवीदारांना पैसे परत करण्याची व्यवस्था असते, या काळात जर ठेवींची मुदत पूर्ण होण्यापूर्वी जर कोणी किंवा मोठा समूह पैसे परत मागण्यास आला तर मोठी अडचण होते. या आगंतुक मागणीची पूर्तता केली तर ज्यांची मुदत सम्पते त्यांना काय द्यायचे? असा प्रश्न पडतो.
आशा स्थितीत जर मुदती पूर्वी किंवा मुदत पूर्ण झाल्यावर अनेकजण पैसे मागण्यास आले तर करायचे काय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
बेळगाव तालुक्यातील एक सहकारी पथ संस्था सध्या संचालकांनी कमिशन घेउन दिलेल्या लोन बद्दल चर्चेत आहे,
Trending Now