बेळगाव स्मार्ट सिटी परियोजनेत अधिकाऱ्यांनी राजकीय प्रेरित होऊन कामे करू नयेत असे भाजप बेळगाव निवडणूक प्रभारी राष्ट्रीय किसान मोर्चाचे अध्यक्ष शंकर गौडा पाटील यांनी म्हटलं आहे.
बेळगावात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.स्मार्ट सिटी योजनेत केंद्र सरकारने मोठा निधी दिला असला तरी अधिकारी कामे सुरू करायला विलंब करत आहेत शहरातील ट्रॅफिक समस्या सोडविण्यासाठी अगोदर स्मार्ट सिटी योजनेतून रिंग रोड करा अशी सूचना देखील त्यांनी अधिकाऱ्यांना केली आहे.
नाल्यांचं संरक्षण करा
बांगला देशातील नागरिकांचं आधार कार्ड बनवण्याचं बेळगाव हे केंद्र बनले असून अनेकजण विदेशी नागरिक वास्तव्यास आहेत शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिगडली असल्याचा आरोप देखील पाटील यांनी केला आहे. जाधननगर मध्ये नाल्यावर बांधकाम करण्यात आले आहे जाधव नगरचा मोठा जिवंत नाला आहे बुडा अध्यक्ष असतेवेळी आम्ही सर्व्हे केला होता से नाले वाचवायला हवेत अस देखील ते म्हणाले.
अधिकारी आमदार सेठ इशाऱ्यावर
महा पालिकेचे आणि शहरातील इतर अधिकारी आमदार फिरोज सेठच्या ताटा खालचे मांजर बनले आहेत सर्व काम त्यांच्या इशाऱ्यावर करत आहेत असा आरोप राजू टोपन्नावर यांनी केला