रहदारीला अडसर होणार नाही अशी उपाययोजना करून जनेतला विश्वासात घ्या आणि उड्डाण पुलाच काम सुरू करा अशी सूचना उत्तर कर्नाटक प्रादेशिक आयुक्त शिवयोगी कळसद यांनी केली आहे.
शुक्रवारी सकाळी विविध संघटनांच्या प्रतिनिधीनी कळसद यांची भेट घेऊन उड्डाण पुला संदर्भात समस्या मांडल्या होत्या.त्यानंतर लगेच प्रादेशिक आयुक्तांनी रेल्वे उड्डाण पुलाची पाहणी करून रेल्वे अधिकारी पालिका अधिकाऱ्यांना ही सूचना केली आहे.
वाहतुकीला अडसर होऊ नये यासाठी दिशा दर्शक फलक लावा,शिक्षण खात्याच सहकार्य घेत शाळा कॉलेज मधून उड्डाण पूल रहदारी बद्दल जनजागृती करा आणि पर्यायी मार्ग सुरू करूनच लोकांना विश्वासात घेऊन उड्डाण पुलाच काम सुरू करा अश्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
यावेळी सिटीजन फोरम च्या वतीनं प्रादेशिक आयुक्तांना रहदारीच्या समस्या आणि तोडगा यावर सविस्तर माहिती देताना डेक्कन हॉस्पिटल आणि भांदुर गल्ली गेट दुचाकी आणि तिचाकी साठी सुरू करा अशी मागणी केली.सुरक्षेच निमित्य पुढं करत रेल्वे अधिकाऱ्यांनी डेक्कन हॉस्पिटल गेट सुरू करणे शक्य नसल्याचे स्पष्ट केलं.सदर उड्डाण पुलाच काम 2018 जून च्या आत पूर्ण होईल असं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं. यावेळी सिटीजन फोरम च्या वतीनं सतीश तेंडुलकर,शेवंतीलाल शाह,विकास कलघटगी,कुलकर्णी यांनी प्रादेशिक आयुक्तांना सविस्तर माहिती दिली.पालिका आयुक्त शशिधर कुरेर,अभियंते आर एस नाईक,लक्ष्मी निप्पणीकर, रेल्वे अभियंता श्रीनिवास आदी उपस्थित होते.
Trending Now