गेल्या चार दिवसापासून कामत गल्ली परिसरात दुर्गंधी पसरली होती कसाई खाण्यातील मृतक जनावर गटारीत अडकल्याने कसाई गल्ली कामत गल्ली भागात दुर्गंधी पसरली होती त्यामुळे याचा त्रास या भागातील जनतेला होत होता.
कामत गल्ली भागातील लोकांनी स्थानिक नगरसेवक बाबूलाल मुजावर यांना पाचारण केल त्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी तब्बल चार तास प्रयत्न करून ड्रीनेज फोडून मृतक जनावरास बाहेर काढले त्यावेळी या भागातील लोकांनी सुटकेचा श्वास घेतला.गटारीत गेली चार दिवस मृत जनावर अडकल्याने याचा त्रास या भागातील लोकांना होत होता सदर जनावर कुजलेल्या स्थितीत होत यामुळे येथील लोकांचे श्वास घेणे देखील मुश्कील होऊन बसले होते शेवटी पालिकेच्या आरोग्य खात्याची २० जणांच्या पथकाने सकाळी ९ ते दुपारी एक या वेळेत प्रयत्न करून मृतक जनावरास बाहेर काढले.
कसाई गल्लीतील कसाई खाण्यातून गटारीतून वाहात जनावराचा मृतदेह गटारीतून कामात गल्लीकडे आला होता आत गटार बंद झाली होती त्यामुळे पाणी पुढे जात नव्हते शेवटी स्थानिक लोकांनी पालिकेच्या कर्मचाऱ्याना पाचारण करून जनावर बाहेर काढले. कसाई खान्यात योग्य रित्या सुविधा नसल्याने हा प्रकार घडला आहे त्यामुळे अश्या स्थितीत पालिकेने कसाई गल्लीतील कसाई खाना गावा बाहेर स्थलांतर करणे गरजेचे आहे तरच बेळगाव स्मार्ट सिटी होणार आहे